शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

रेल्वेतील ३ हजारांवर फेरीवाल्यांवर कारवाईचा दंडूका; RPF ची कारवाई, राज्यभरात २४ हजारांवर गुन्हे दाखल

By नरेश डोंगरे | Updated: December 25, 2023 18:44 IST

आरडाओरडीमुळे प्रवासी रेल्वेगाड्यात लांब अंतराचा प्रवास करताना निट आरामही करू शकत नाहीत.

नागपूर : मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाईचा दंडूका चालविला आहे. नागपूर विभागात गेल्या आठ महिन्यात तब्बल ३१७९ फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आकडा २४,३३९ एवढा आहे. रेल्वेगाडीत चढून आरडाओरड करीत खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. जवळपास प्रत्येकच रेल्वेगाडीत त्यांचा सकाळपासून रात्रीपर्यंत धुमाकूळ सुरू असतो.

त्यांच्या आरडाओरडीमुळे प्रवासी रेल्वेगाड्यात लांब अंतराचा प्रवास करताना निट आरामही करू शकत नाहीत. प्रवाशांच्या सारख्या वाढत्या तक्रारीमुळे रेल्वे प्रशासनाने या फेरीवाल्यांना आवरण्याची जबाबदारी आरपीएफवर सोपविली. त्यानुसार, आरपीएफने मध्य रेल्वेच्या पाचही विभागात धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका लावला. त्यानुसार गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत आरपीएफने नागपूर विभागात फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका लावला. तब्बल ३१८१ गुन्हे दाखल करून ३१७९ फेरीवाल्यांना अटक करण्यात आली. मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील फेरीवाल्यांवर कारवाईचा आकडा मोठा आहे. पाच विभागात एकूण २४,३३९ गुन्हे दाखल करून आरपीएफने २४,३३४ फेरीवाल्यांना अटक केली. त्यांच्याकडून ३.५ कोटी रुपये दंडही वसूल करण्यात आला. कारवाईची विभागनिहाय माहिती

  • मुंबई विभागात ९३९४ गुन्ह्यांची नोंद, ९३९३ जणांना अटक आणि १.०२ कोटी रुपये दंड वसूल 
  • भुसावळ विभागात ७२०६ गुन्हे दाखल, ७२०५ लोकांना अटक आणि १.२९ कोटींचा दंड वसूल
  • पुणे विभागाच्या आरपीएफने १९९० गुन्हे दाखल करून १९९१ लोकांना अटक केली. त्यांच्याकडून १३.८८ लाख दंड वसूल
  • आरपीएफ सोलापूर विभागाने २५६८ गुन्हे दाखल करून २५६६ लोकांना अटक केली. त्यांच्याकडून २५.८७ लाख रुपये दंड वसूल 
टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे