आॅटोंसह ४९ वाहनांवर कारवाई
By Admin | Updated: September 11, 2014 01:10 IST2014-09-11T01:10:56+5:302014-09-11T01:10:56+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सुरू असलेल्या आॅटो मीटर सक्ती मोहिमेंतर्गत बुधवारी ४९ वाहनांना पकडण्यात आले. यात आॅटोसोबतच काही अवैध प्रवासी वाहनांचाही समावेश होता.

आॅटोंसह ४९ वाहनांवर कारवाई
आॅटो मीटर मोहीम : वाहतूक पोलिसांचाही सहभाग
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सुरू असलेल्या आॅटो मीटर सक्ती मोहिमेंतर्गत बुधवारी ४९ वाहनांना पकडण्यात आले. यात आॅटोसोबतच काही अवैध प्रवासी वाहनांचाही समावेश होता.
गेल्या १ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या अभियानात आरटीओच्या चमूला वाहतूक पोलिसांचीही साथ मिळाली. वाहतूक पोलिसांचे केवळ ५ जवान सध्या या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
बुधवारी झालेल्या कारवाईनंतर १५ वाहनांना सोडण्यात आले. वाहनांवर करण्यात आलेल्या आर्थिक दंडातून १ लाख २५ हजार १०० रुपये दंड वसुलण्यात आला. मीटरसाठी सुरू असलेल्या या अभियानादरम्यान आॅटो चालक युनियनतर्फे अवैध प्रवासी वाहनांवर कठोर कारवाई करण्यासाठी जोर दिला जात आहे. त्यामुळे या कारवाईत वाहतूक पोलिसांचे सहकार्य आवश्यक आहे.
दोन्ही विभाग एकत्रित काम करीत असल्याने अवैध आॅटो व इतर वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)