२९ प्रतिष्ठानांवर कारवाई; २.१५ लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:08 IST2021-05-11T04:08:13+5:302021-05-11T04:08:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी २९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लाख १५ हजारांचा दंड ...

Action on 29 establishments; 2.15 lakh fine | २९ प्रतिष्ठानांवर कारवाई; २.१५ लाखाचा दंड

२९ प्रतिष्ठानांवर कारवाई; २.१५ लाखाचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी २९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लाख १५ हजारांचा दंड वसूल केला. पथकाने ५८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

लक्ष्मीनगर विभागांतर्गत तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजाराचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून २५ हजार, हनुमाननगर विभागाच्या पथकाने ५ हजार, धंतोलीच्या पथकाने १० हजाराचा दंड वसूल केला. नेहरूनगर येथे १२ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये, गांधीबाग येथे सात प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार रुपये, सतरंजीपुरा येथे पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ५५ हजार रुपये दंड वसूल केला. लकडगंज पथकाने ५ हजार रुपये, आसीनगर पथकाने १४ प्रतिष्ठानांची तपासणी करून ५५ हजार तर मंगळवारी झोन पथकाने ३० हजार रुपयाचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.

Web Title: Action on 29 establishments; 2.15 lakh fine