२५ प्रतिष्ठानांवर कारवाई; २.८ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST2021-05-23T04:07:34+5:302021-05-23T04:07:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शनिवारी २५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लाख ८ हजारांचा ...

Action on 25 establishments; 2.8 lakh fine | २५ प्रतिष्ठानांवर कारवाई; २.८ लाखांचा दंड

२५ प्रतिष्ठानांवर कारवाई; २.८ लाखांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शनिवारी २५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लाख ८ हजारांचा दंड वसूल केला. पथकाने ५० प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत एका प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजारांचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ३५ हजार, हनुमाननगर पथकाने दोन दुकानाची तपासणी करून १० हजार, धंतोलीच्या पथकाने १० दुकानांची तपासणी १५ हजारांचा दंड वसूल केला. नेहरूनगर येथे प्रतिष्ठानांची तपासणी करून २५ हजार रुपये, गांधीबाग येथे सात प्रतिष्ठानांची तपासणी करून ३५ हजार रुपये, सतरंजीपुरा येथे चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये दंड वसूल केला. लकडगंज पथकाने चार दुकानांची तपासणी २३ हजार रुपये, आसीनगर पथकाने ११ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार तर मंगळवारी झोन पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी करून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.

Web Title: Action on 25 establishments; 2.8 lakh fine