२०० वाहनचालकांवर कारवाई

By Admin | Updated: July 29, 2015 03:14 IST2015-07-29T03:14:01+5:302015-07-29T03:14:01+5:30

वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

Action on 200 Drivers | २०० वाहनचालकांवर कारवाई

२०० वाहनचालकांवर कारवाई

नागपूर : वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे शहरात जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच सिटबेल्टची उपयुक्तता समजूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वाहतूक पोलिसांच्या दक्षिण शाखेने मंगळवारी सिटबेल्ट न बांधणाऱ्या २०० वाहनचालकांवर कारवाई केली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाईची ही पहिलीच वेळ आहे. ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेऊन या कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.
सिटबेल्ट (सेफ्टीबेल्ट) १२५ केंद्रीय मोटार वाहन कायदा १९९३ ए १ नुसार पुढील आसनाला सिटबेल्ट बसवणं वाहन (छाट्या कार) उत्पादकाला कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे वाहनात समोर बसलेल्या व्यक्तींसाठीच सिटबेल्ट असल्याचे मानले जाते. पण हे चुकीचे आहे. समोर बसलेल्या व्यक्तीप्रमाणोच गाडीत मागे बसलेल्या व्यक्तींनीही सिटबेल्ट बांधणो गरजेचे आहे.
तज्ज्ञाच्या मते, अपघात झालाच तर सिटबेल्ट वापरणारी व्यक्ती तो न वापरणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत वाचण्याची शक्यता ७० टक्के जास्त असते.
दुर्दैवाने या सिटबेल्टचा वापर अनेक जण पोलिसांच्या धास्तीनेच बांधताना दिसून येतात. मंगळवारी वाहतूक पोलिसांनी सिटबेल्ट तपासणीची मोहीम हाती घेतली. यात २०० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. याची चर्चा शहरभर पसरताच जो-तो सिटबेल्ट बांधूनच वाहन चालवित असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)

Web Title: Action on 200 Drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.