शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

नागपुरात २ हजार ९४२ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:42 PM

वाहतूक पोलिसांनी २६ ते २८ जुलै २०१७ या कालावधीत विशेष मोहीम राबवून २ हजार ९४२ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तसेच, ६२६ अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांच्या नावाने चालान फाडले आहे.विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आले. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात माहिती : ६२६ पालकांच्या नावाने फाडले चालान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूक पोलिसांनी २६ ते २८ जुलै २०१७ या कालावधीत विशेष मोहीम राबवून २ हजार ९४२ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तसेच, ६२६ अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांच्या नावाने चालान फाडले आहे.विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आले. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व मध्य विभागासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. अपघात टाळण्यासाठी आवश्यक तेथे योग्य उंचीचे स्पीड ब्रेकर्स व साईन बोर्ड लावण्याचे निर्देश मनपाला देण्यात आले आहेत. १ ते ३१ जानेवारी २०१७ या कालावधीत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या  २७ हजार ७८३ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा दारू पिऊन वाहन चालविणारे ५२ जण आहेत. याशिवाय विभागीय आयुक्तांनी बैठकीमध्ये विविध मुद्यांवर आदेश दिले व सूचना केल्या. न्यायालयाने त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. याप्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र आहेत.वाठोड्यात नंदग्राम प्रकल्पशहरातील जनावरांचे गोठे स्थानांतरित करण्यासाठी नंदग्राम प्रकल्पांतर्गत वाठोडा येथे ४४.०६ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी ४६८० जनावरांना गोठे उपलब्ध होऊ शकतात.६१ शिकवणी वर्गांना नोटीसशहरात ६६ खासगी शिकवणी वर्ग असून त्यापैकी ६१ शिकवणी वर्गांना पार्किंग समस्येबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ६१ मधील १२ शिकवणी वर्गांनी पार्किंगची व्यवस्था केली आहे. इतरांना यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर