शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्यांची धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 20:55 IST

शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या तिघांना पकडून संतप्त जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर त्यांना लकडगंज पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी सायंकाळी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.

ठळक मुद्देपोलिसांच्या हवाली केले : लकडगंजमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या तिघांना पकडून संतप्त जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर त्यांना लकडगंज पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी सायंकाळी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. विशेष म्हणजे, मुलींचे वय १३ वर्षे आहे तर आरोपींमध्ये एक ४० वर्षांचा आहे.तक्रार करणारी मुलगी (वय १३) तिच्या दोन वर्गमैत्रिणींसोबत शाळा आटोपून शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घराकडे निघाली. गंगाबाई घाट रोड, टाईल्सच्या दुकानासमोर आरोपी सिध्दार्थ ऊर्फ मढ्या शिवदास रामटेके (वय २०), रणजित प्रेमदास माटे (वय ४०) आणि सौरभ रामाधार यादव (वय २०) हे तिघे दुचाकीने मुलींच्या मागे आले. तुम्ही आमच्या गाडीवर बसल्या नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन आरोपींनी त्यांच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. मुलींनी आरडाओरड केल्याने आजूबाजूची मंडळी धावून आली. त्यांनी तिन्ही आरोपींना पकडून त्यांची बेदम धुलाई केली. त्यानंतर त्यांना लकडगंज पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.आरोपींपैकी एक सराईत गुन्हेगारअटक करण्यात आलेले आरोपी घटनेच्या वेळी दारूच्या नशेत टून्न होते. आरोपी रामटेके हा गुन्हेगारी वृत्तीचा असून, यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे लकडगंज पोलीस सांगतात.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाMolestationविनयभंग