बलात्कार पीडितेला अश्लील फोटो पाठवीत होता आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:09 IST2021-09-19T04:09:45+5:302021-09-19T04:09:45+5:30

तौसिफ खान (३४, रा. हसनबाग) असे आरोपीचे नाव आहे. पीडित वारंवार पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतरही कारवाई न केल्यामुळे आरोपीची हिंमत ...

The accused was sending obscene photos to the rape victim | बलात्कार पीडितेला अश्लील फोटो पाठवीत होता आरोपी

बलात्कार पीडितेला अश्लील फोटो पाठवीत होता आरोपी

तौसिफ खान (३४, रा. हसनबाग) असे आरोपीचे नाव आहे. पीडित वारंवार पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतरही कारवाई न केल्यामुळे आरोपीची हिंमत वाढली होती. त्यानंतर आरोपीने पीडितेला व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो, मेसेज पाठवून अपमानित केले. अखेर ९ सप्टेंबरला पीडितेने पोलीस उपायुक्त अक्षय शिंदे यांना भेटून पुराव्यांसह तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांमध्ये खळबळ उडाली. आरोपी तौसिफविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला तुरुंगात पाठविले आहे.

.......

घरात घुसून केला बलात्कार

पीडित महिलेचा पती तौसिफचा मित्र होता. पतीने सोडल्यानंतर तौसिफ पीडितेच्या घरी जात होता. २४ जानेवारीला तौसिफने तिला एकटी पाहून तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित महिला आरोपीच्या पत्नीला माहिती देण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. ते पाहून आरोपीने तिला मारहाण केली. पीडितेच्या तक्रारीवरून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला, परंतु काही दिवसांतच त्याला जामीन मिळाला. त्यानंतर आरोपीने तिला त्रास देणे सुरू केले होते.

.................

Web Title: The accused was sending obscene photos to the rape victim