सायलेन्सर चोरणाऱ्या आरोपींचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:52+5:302021-05-30T04:07:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कारचे सायलेन्सर चोरून त्याची विक्री करणाऱ्या दोघांचा छडा लावून सक्करदरा पोलिसांनी त्यांना अटक केली. ...

सायलेन्सर चोरणाऱ्या आरोपींचा छडा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारचे सायलेन्सर चोरून त्याची विक्री करणाऱ्या दोघांचा छडा लावून सक्करदरा पोलिसांनी त्यांना अटक केली. शेख निसार शेख कादिर तसेच शेख इक्बाल शेख जहीर कुरेशी अशी या दोघांची नावे आहेत. सक्करदऱ्यातील हेमंत पुंडलीकराव कापसे यांनी त्यांची मारुती इको स्पोर्ट कार २ मार्चला घरासमोर ठेवली होती. ३ मार्चला त्यांना त्यांच्या कारचे सायलेन्सर आणि इतर साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आले. सक्करदरा पोलीस ठाण्यात कापसे यांनी तक्रार नोंदविली. त्यावरून ठाणेदार सत्यवान माने आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. दोन दिवसांपूर्वी आरोपी निसार आणि इकबाल पोलिसांच्या हाती लागले. त्यांनी सक्करदरातील भांडे प्लॉट, आशीर्वाद नगर, बिडीपेठ, मोठा ताजबाग तसेच हुडकेश्वर, वाठोडा आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ११ मारुती इकोस्पोर्ट कारचे सायलेन्सर चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
---
५० हजारांचे एक सायलेन्सर
अशा प्रकारची चोरी करण्याचे प्रकरण पहिल्यांदाच उजेडात आले आहे. कारच्या एका सायलेन्सरची किंमत ५० हजार रुपये आहे. संबंधित व्यक्तीकडून तक्रार दाखल होऊनही पोलीस फारसे गांभीर्याने तपास करत नसल्याने आरोपींचे फावले होते. मात्र सक्करदरा पोलिसांनी कसून चौकशी केल्याने आरोपी हाती लागले.
---