शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘ओएचई’ वायर चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 20:04 IST

लॉकडाऊनदरम्यान रेल्वेची ‘ओएचई’ वायर चोरी करून ते भंगार व्यावसायिकाला विकणाºया ४ आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात अटक केली असून त्यांच्याकडून ५५,८८० रुपये किमतीची वायर जप्त केली आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : घडेला ते भीमालगोंडी दरम्यानची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनदरम्यान रेल्वेची ‘ओएचई’ वायर चोरी करून ते भंगार व्यावसायिकाला विकणाºया ४ आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात अटक केली असून त्यांच्याकडून ५५,८८० रुपये किमतीची वायर जप्त केली आहे.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या घडेला ते भीमालगोंडी दरम्यान मागील २ महिन्यांपासून लॉकडाऊनचा फायदा घेऊन अज्ञात आरोपींनी ३ वेळा रेल्वेच्या ओएचई वायरची चोरी केली. आरोपींना पकडण्यासाठी छिंदवाडाचे निरीक्षक एम. के. सिंह तसेच नागपूरच्या गुन्हे शाखेच्या डिटेक्टिव्ह विंगचे निरीक्षक विकास कुमार आणि चमूचे गठन करण्यात आले. विभागीय सुरक्षा आयुक्त ए. के. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. १० जूनला आरपीएफच्या चमूने घडेला ते भीमालगोंडी दरम्यान रात्री गस्त घातली. यावेळी किलोमीटर क्रमांक १३१३/९-१० येथील अंडरब्रीजजवळ काही व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी ओएचई वायर चोरी करून विकल्याची कबुली दिली. आतापर्यंत ३ वेळा चोरी करून २६५ मीटर केबल चोरी केला. आरपीएफने एकूण ६ आरोपींना अटक करून ५५,८८० रुपयांचा वायर जप्त केला. आरोपींविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेtheftचोरीArrestअटक