दारूतस्करी करणारा आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:09 IST2021-09-27T04:09:32+5:302021-09-27T04:09:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बहुचर्चित दारू विक्रेता अशोक वंजानी यांच्याशी संबंधित तरुणाला दारूची तस्करी करताना गुन्हे शाखेच्या पथकाने ...

Accused of smuggling alcohol arrested | दारूतस्करी करणारा आरोपी जेरबंद

दारूतस्करी करणारा आरोपी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बहुचर्चित दारू विक्रेता अशोक वंजानी यांच्याशी संबंधित तरुणाला दारूची तस्करी करताना गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रंगेहाथ पकडले. अमित हिरालाल मते, असे त्याचे नाव आहे. तो नंदनवनमध्ये राहतो.

जरीपटक्यातील क्लार्क टाउनमधील रहिवासी अशोक वंजानींची सेंट्रल एव्हेन्यूवर चंद्रलोक बिल्डिंगमध्ये वासन वाइन शॉप आहे. अमित येथे काम करतो. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दारूच्या ५० बाटल्या दुचाकीत ठेवून तो मोतीबागमधील एका महिलेच्या अड्ड्यावर जात होता. गुन्हे शाखेला टिप मिळताच त्यांनी रस्त्यातच त्याच्या मुसक्या बांधल्या. वंजानीच्या सांगण्यावरून सायरा बेगमच्या अड्ड्यावर नेणार होतो, असे सांगितल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी मतेसोबतच वंजानी आणि सायरा बेगम मोहम्मद सकूर या दोघांनाही आरोपी बनवून तहसील पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

विशेष म्हणजे, वंजानीचे नाव यापूर्वीही अनेकदा दारूतस्करीत आले आहे. त्याच्या वाइन शॉपमध्येही पोलिसांनी यापूर्वी कारवाई केली होती. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर चाैरसिया आणि त्यांच्या पथकातील सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

----

Web Title: Accused of smuggling alcohol arrested