आरोपीला १० वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:10 IST2021-09-22T04:10:23+5:302021-09-22T04:10:23+5:30

नागपूर : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने कमाल दहा वर्षे सश्रम कारावास व ...

Accused sentenced to 10 years imprisonment | आरोपीला १० वर्षे कारावास

आरोपीला १० वर्षे कारावास

नागपूर : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने कमाल दहा वर्षे सश्रम कारावास व एकूण चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्या. ओ. पी. जयस्वाल यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.

उमेश भुजंगराव पंधरे (वय २३) असे आरोपीचे नाव असून तो काचुरवाही (ता. रामटेक) येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १४ वर्षे वयाची होती. आरोपीने १३ फेब्रुवारी २०१९ रोजी पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. त्याची कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. तत्पूर्वी आरोपीने मुलीवर बलात्कार केला होता. गुन्हा नोंदविल्यानंतर आरोपीला २४ फेब्रुवारी २०१९ रोजी अटक करण्यात आली.

Web Title: Accused sentenced to 10 years imprisonment