तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, आरोपी फरार
By Admin | Updated: March 3, 2017 14:54 IST2017-03-03T14:54:58+5:302017-03-03T14:54:58+5:30
नात्यातील मुलीवर वारंवार अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणा-या नराधमाविरुद्ध जरीपटका पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, आरोपी फरार
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 3 - नात्यातीलच मुलीवर वारंवार अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणा-या नराधमाविरुद्ध जरीपटका पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपी जरीपटक्यात राहतो. तो ५० वर्षांचा आहे. आई बाहेर कामावर गेल्यामुळे पीडित मुलगी (वय १९) २६ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता घरात एकटी होती. ते पाहून या नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्यानंतर आरोपी शिवीगाळ करून पळून गेला.
२८ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० वाजता त्याने पुन्हा असाच प्रकार केला. यावेळी मुलीने आरडाओरड करून नातेवाईकांना सांगितले. मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपी पळून गेला. तेव्हापासून नातेवाईक आणि शेजारची मंडळी त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलगी या प्रकारामुळे प्रचंड दहशतीत वावरत आहे. तो पुन्हा असे कृत्य करू शकतो, हे माहिती असल्याने मुलीने गुरुवारी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक के. डी. वाघ यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.