खून प्रकरणी आरोपीला आजन्म कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:06 IST2018-04-12T23:05:54+5:302018-04-12T23:06:12+5:30
सत्र न्यायालयाने गुरुवारी नरखेड तालुक्यातील खून प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. जे. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला.

खून प्रकरणी आरोपीला आजन्म कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी नरखेड तालुक्यातील खून प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. जे. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला.
सुधाकर लक्ष्मण नेहारे (४२) असे आरोपीचे नाव असून, तो दावसा येथील रहिवासी आहे. रामाजी गामाजी राऊत (७५) असे मयताचे नाव होते. तो पाळीव जनावरे चारण्याचे काम करीत होता. नेहारेची वहिनी आजारी पडली होती. तिच्यावर रामाजीने काळी जादू केली, असा नेहारेला संशय होता. २४ आॅगस्ट २०१६ रोजी रामाजी नेहमीप्रमाणे जनावरे चारण्यासाठी शेतात गेला होता. दरम्यान, नेहारेने त्याचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. मयताचा मुलगा सुरेश याच्या तक्रारीवरून जलालखेडा पोलिसांनी एफआयआर नोंदवला व आरोपीला अटक केली. तसेच, तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. अर्चना नायर यांनी बाजू मांडली.