हायकोर्ट : सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला पाच वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 20:27 IST2020-09-11T20:26:36+5:302020-09-11T20:27:41+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून ५ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.

Accused of killing Sakhya's brother sentenced to five years in prison | हायकोर्ट : सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला पाच वर्षांचा कारावास

हायकोर्ट : सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला पाच वर्षांचा कारावास

ठळक मुद्दे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत दोषी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून ५ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अविनाश घरोटे यांनी विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला.
सुभाष रामलाल काळे (४३) असे आरोपीचे नाव असून तो नरसाळा, ता. सावनेर येथील रहिवासी आहे. २४ मे २०१९ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला खुनाच्या गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून आजन्म कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. आरोपीला भावाचा खून करायचा नव्हता. भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात त्याने भावाला मारहाण केली. त्यात भावाचा मृत्यू झाला असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवून आरोपीचे अपील अंशत: मंजूर केले आणि सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून वरीलप्रमाणे सुधारित निर्णय दिला. मयताचे नाव अविनाश होते. या प्रकरणात केळवद पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.

असा आहे घटनाक्रम
आरोपीच्या वडिलाकडे नऊ एकर जमीन होती. ती जमीन तीन भावांनी वाटून घेतली. शेतीमधील घरात आरोपी व मयत अविनाश रहात होते. दरम्यान, जमिनीच्या फेरफारसाठी लागणाऱ्या खर्चावरून दोन्ही भावात वाद झाला. ४ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी आरोपीने अविनाशला जळत्या लाकडाने जबर मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Accused of killing Sakhya's brother sentenced to five years in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.