पादचाऱ्याचा जीव घेणाऱ्या आरोपीचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST2020-12-06T04:08:05+5:302020-12-06T04:08:05+5:30
नागपूर - आठ महिन्यांपूर्वी एका पादचाऱ्याला जोरदार धडक मारून त्याचा जीव घेणाऱ्या आरोपी दुचाकीचालकाचा अखेर जरीपटका पोलिसांनी छडा लावला. ...

पादचाऱ्याचा जीव घेणाऱ्या आरोपीचा छडा
नागपूर - आठ महिन्यांपूर्वी एका पादचाऱ्याला जोरदार धडक मारून त्याचा जीव घेणाऱ्या आरोपी दुचाकीचालकाचा अखेर जरीपटका पोलिसांनी छडा लावला. बॉबी डिसेल हासिम डिसूझा (वय २०) असे आरोपीचे नाव असून तो मोहननगर खलासी लाईनमध्ये राहतो.
जरीपटक्यातील गुरुद्वारासमोर फूटपाथवर राहणाऱ्या हंसराज रामदास हिरेखन (वय ४५)यांना आरोपी डिसूझा याने भरधाव दुचाकी चालवून १९ एप्रिलच्या पहाटे ३.४५ च्या सुमारास जोरदार धडक मारली होती. गंभीर जखमी झालेल्या हिरेखन यांना उपचाराकरिता मेयोत भरती करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ३ मे च्या दुपारी १ च्या सुमारास डॉक्टरांनी हिरेखन यांना मृत घोषित केले. त्यावेळी जरीपटका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून प्रकरण तपासात घेतले. तपासात आरोपी डिसूझा याने निष्काळजीपणे वाहन चालवून हिरेखनचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाल्याने जरीपटका पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
---