दहा वर्षांपासून फरार आरोपीस पकडले

By Admin | Updated: August 21, 2016 03:25 IST2016-08-21T03:25:46+5:302016-08-21T03:25:46+5:30

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात २००६ पासून फरार असलेल्या आरोपीस लोहमार्ग पोलिसांच्या विशेष चमूने सिनेस्टाईल अटक करून

The accused have been arrested for ten years | दहा वर्षांपासून फरार आरोपीस पकडले

दहा वर्षांपासून फरार आरोपीस पकडले


नागपूर : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात २००६ पासून फरार असलेल्या आरोपीस लोहमार्ग पोलिसांच्या विशेष चमूने सिनेस्टाईल अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर २००६ मध्ये प्लॅटफार्म क्रमांक २ वर प्रणय अजय हाडके (३०) रा. खामला जुनी वस्ती या आरोपीने मोटोरोला कंपनीचा १२ हजार रुपये कंपनीचा मोबाईल चोरल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या विरुद्ध भादंवि ३७९ नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले होते. २००६ मध्ये न्यायालयाने आरोपीची जामिनावर मुक्तता केली होती. तेव्हापासून २०१६ पर्यंत आरोपी फरार होता. नुकताच न्यायालयाने आरोपीचा पकड वॉरंट जारी केल्यामुळे लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांनी आरोपीला पकडण्यासाठी एक विशेष चमू तयार केली. या चमूने मागील दोन महिन्यापासून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. दरम्यान शनिवारी २० आॅगस्ट २०१६ रोजी लोहमार्ग पोलिसांची चमू आरोपीच्या राहत्या पत्त्यावर गेली. त्यांनी आरोपीच्या कुटुंबीयांना विचारपूस केली असता तो घरात नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. परंतु पोलिसांना तो घरात असल्याची शंका आली. आरोपीला आवाज दिला असता तो त्याच्या घराच्या मागच्या दरवाजाने पळून जाताना दिसला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो आपल्या घराच्या छतावर चढला. पोलीसही छतावर चढले असता तो वस्तीतील एका छतावरून दुसऱ्या छतावर सिनेस्टाईल उड्या मारून पळण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास अटक केली. त्याची न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The accused have been arrested for ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.