आरोपीला मिळाला अंतरिम अग्रिम जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:09 IST2021-04-08T04:09:46+5:302021-04-08T04:09:46+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनाच्या प्रयत्नातील एका आरोपीला अंतरिम अग्रिम जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती रोहित देव ...

The accused got interim anticipatory bail | आरोपीला मिळाला अंतरिम अग्रिम जामीन

आरोपीला मिळाला अंतरिम अग्रिम जामीन

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनाच्या प्रयत्नातील एका आरोपीला अंतरिम अग्रिम जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला. आरोपी गडचिरोली येथील असून राम शैलेंद्र हलदार असे त्याचे नाव आहे. तक्रारकर्ता धर्मेंद्र सरकार याने गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा पोलीस स्टेशनअंतर्गत तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्त्याच्या मते, त्याचा राम हलदारसोबत शेतीच्या मालकी हक्कावरून वाद सुरू आहे. १ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता फिर्यादीचा भाऊ सुनिर्मल सरकार आपल्या दुचाकीने गणेशनगरवरून मुलचेरा येथे निघाला होता. यादरम्यान, हलदार याने खून करण्याच्या इराद्याने आपल्या कारची ठोस त्याच्या दुचाकीला मारली होती. या अपघातामध्ये सुनिर्मल गंभीर जखमी झाला होता. आरोपीने याप्रकरणी ॲड. रमेश रावलानी व अतुल रावलानी यांच्यामार्फत हायकोर्टात अग्रिम जामीनासाठी याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान ॲड. रमेश रावलानी यांनी निव्वळ शंकेच्या आधारावर फिर्यादींनी घटनेच्या चार-पाच दिवसांनी तक्रार दाखल केली होती, असे निदर्शनास आणून दिले. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने हा निर्णय घेतला.

Web Title: The accused got interim anticipatory bail