दरोड्याच्या तयारीतील आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:09 IST2021-01-15T04:09:01+5:302021-01-15T04:09:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा सशस्त्र गुन्हेगारांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. राजकुमार ऊर्फ जंबो ...

Accused Gajaad in preparation for robbery | दरोड्याच्या तयारीतील आरोपी गजाआड

दरोड्याच्या तयारीतील आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा सशस्त्र गुन्हेगारांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. राजकुमार ऊर्फ जंबो मंगल पाल (रा. गुलशननगर), पिल्लू काशीराम शाहू (वय २३, रा. आदिवासी प्रकाश नगर), सागर नरेश विश्वकर्मा (२१, रा. डिप्टी सिग्नल), हर्षल किसन उईके (२७, रा. गोरेवाडा), लखन शंकर गोरे (२५, रा. गोरेवाडा) आणि संजय विनायक भिमटे (२५) अशी आरोपींची नावे आहेत.

बुधवारी मध्यरात्री गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे एपीआय अमोल काचोरे आपल्या सहकाऱ्यांसह कळमना भागात गस्त करत होते. कामठी मार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ काही आरोपी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी तेथे छापा मारला. पोलिसांना पाहून आरोपी पळू लागले. मात्र, पोलिसांनी त्यांची गचांडी धरली. त्यांच्याकडून चाकू, तलवार, मिरची पावडर, कटोनी, पेचकस, दोर, मोटारसायकल आणि लाकडी दांडा जप्त करण्यात आला. या सर्वांना कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Accused Gajaad in preparation for robbery