गोळीबारातील आरोपी अटकेत
By Admin | Updated: April 2, 2015 02:28 IST2015-04-02T02:28:29+5:302015-04-02T02:28:29+5:30
उत्तर नागपुरात दोन टोळ्यांमध्ये झालेल्या अंधाधुंद गोळीबार प्रकरणात पोलिसांनी लिटील सरदारच्या साळ्यासह तिघांना अटक केली आहे.

गोळीबारातील आरोपी अटकेत
नागपूर : उत्तर नागपुरात दोन टोळ्यांमध्ये झालेल्या अंधाधुंद गोळीबार प्रकरणात पोलिसांनी लिटील सरदारच्या साळ्यासह तिघांना अटक केली आहे. यात लिटीलचा साळा हरविंदरसिंह ऊर्फ रिंकू भाटिया, निर्भयसिंह उर्फ राजू टाक व हरजितसिंह ऊर्फ सितू यांचा समावेश आहे. या घटनेत सितू हा जखमी झाला असून, पोलिसांनी त्याच्या तक्रारीवर गोल्डी भुल्लर व त्याच्या सहकाऱ्यावर हत्येचा प्रयत्न व गोळीबार प्रकरणात गुन्हा नोंदविला आहे. मंगळवारी दुपारी पाटणकर चौकात लिटील सरदार व गोल्डी भुल्लर टोळींनी एकमेकांवर गोळीबार केला. जवळपास अर्धा तास गोळीबार चालू होता. त्यानंतर आरोपी फरार झाले होते. आज दुपारी लिटीलचा साळा रिंकू दोन सहकाऱ्यांसोबत पोलिसांच्या हाती लागला. सूत्रानुसार रिंकू हा क्रिकेट सट्ट्याचे ४० हजार रुपये एका युवकाला देण्यास गेला होता. तो युवक गोल्डी व त्याच्या साथीदारासोबत रिंकूजवळ आला. रिंकू व त्याच्यात मारपीट झाली. त्याने ही गोष्ट लिटील सरदारला सांगितली. लिटील सहकाऱ्यासोबत तेथे आला. तेव्हा गोल्डीने सहकाऱ्यांसोबत पळ काढला होता. (प्रतिनिधी)