शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या ट्रेनमधून आरोपी पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:35 IST

येथून पळून गेल्यानंतर गोवा पोलिसांनी पकडलेल्या एका आरोपीने गिट्टीखदान पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फायदा उचलत धावत्या रेल्वेगाडीतून पळ काढला. रविवारी पहाटे मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. रितिक राकेश शुक्ला(वय २०)असे फरार आरोपीचे नाव आहे. तो जरीपटक्यातील हरिजन कॉलनीतील रहिवासी आहे.

ठळक मुद्देगोवा पोलिसांनी पकडले : गिट्टीखदान पोलिसांनी गमावले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथून पळून गेल्यानंतर गोवा पोलिसांनी पकडलेल्या एका आरोपीने गिट्टीखदान पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फायदा उचलत धावत्या रेल्वेगाडीतून पळ काढला. रविवारी पहाटे मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. रितिक राकेश शुक्ला(वय २०)असे फरार आरोपीचे नाव आहे. तो जरीपटक्यातील हरिजन कॉलनीतील रहिवासी आहे.फ्लिपकार्ट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा शुक्ला ग्राहकांकडून मिळालेले १ लाख १० हजार रुपये घेऊन पळून गेला होता. त्याच्याविरुद्ध या प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी अफरातफरीचा गुन्हा दाखल केला होता. इकडे गिट्टीखदान पोलीस त्याचा शोध घेत होते. तिकडे तो गोव्यात पोहचला. तेथे मौजमजा केल्यानंतर त्याने दुचाकी चोरली. त्यामुळे तेथेही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. गोवा पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीनंतर नागपूर पोलिसांना कळविले. त्यामुळे शुक्लाला ताब्यात घेण्यासाठी गिट्टीखदानचे पोलीस पथक गोव्याला पोहचले. त्यात पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र इंगोले, सहायक उपनिरीक्षक राजेश लोहे तसेच नीलेश आणि आनंद नामक पोलीस शिपायांचा समावेश होता. ट्रान्झिट रिमांडच्या आधारे गोव्यातून त्याला ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी दुपारी पोलीस पथक मुंबईत पोहचले. तेथून विदर्भ एक्स्प्रेसने नागपूरकडे निघाले. पहाटे ३ च्या सुमारास पोलीस पेंगत असल्याचे लक्षात आल्याने आरोपी शुक्लाने बाथरूमला जायचे आहे, असे सांगून नीलेशला जागवले. नीलेशने त्याला हातकडीसह रेल्वेच्या बाथरूमकडे नेले. यावेळी रेल्वेगाडी मलकापूर स्थानकाजवळ असल्याने रेल्वेची गती मंदावली होती. शुक्लाची शरीरयष्टी हाडकुळी असल्यामुळे त्याने हातकडीतून हात काढला आणि दार उघडून धावत्या रेल्वेतून उडी मारून पळून गेला.पोलिसांची भंबेरी उडालीआरोपी पळून गेल्यामुळे नीलेशने आरडाओरड करून सहकाऱ्यांना जागवले. शुक्ला पळून गेल्याचे नीलेशने सांगताच त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी रेल्वेगाडी थांबवून शुक्लाची बरीच शोधाशोध केली. मात्र, अंधारामुळे तो हाती लागला नाही. त्यामुळे स्थानिक वरिष्ठांना कळवून शेगाव पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आलीचार पोलिसांचे पथक असताना एक आरोपी चक्क धावत्या रेल्वेतून उडी मारून फरार होण्याचा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. हा प्रकार पोलिसांच्या हलगर्जीपणाचा विषय ठरला आहे. परिणामी दोषी पोलीस पथकावर चौकशीनंतर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर