चुरडी प्रकरणातील आरोपींना त्वरित पकडून फासावर लटकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST2021-09-23T04:10:55+5:302021-09-23T04:10:55+5:30
नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चुरडी गावच्या बिसेन परिवारातील चौघांची निर्घृणपणे केलेल्या हत्येचा तपास वेगाने करून या ...

चुरडी प्रकरणातील आरोपींना त्वरित पकडून फासावर लटकवा
नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चुरडी गावच्या बिसेन परिवारातील चौघांची निर्घृणपणे केलेल्या हत्येचा तपास वेगाने करून या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केली आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. राज्यात बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील सत्ता पक्ष असो वा प्रमुख विरोधी पक्ष असो एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात मग्न आहेत. त्यामुळेच चुरडीसारखी घटना असो वा महिलांवरचे अत्याचार याचे कुणाला सोयरसुतक राहिलेले नाही. चुरडी प्रकरणाचा वेगाने तपास करून संबंधित सर्व आरोपींना पकडून जलदगती न्यायालयात खटला दाखल करावा. आरोपी फासावर लटकत नाही, तोपर्यंत गृहविभागाने मोकळा श्वास घेऊ नये, अशी मागणीही हेमंत गडकरी यांनी केली.