सरन्यायाधीशांच्या आईला फसविणारा आरोपी तुरुंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 10:46 PM2020-12-16T22:46:00+5:302020-12-16T22:47:19+5:30

Chief Justice's mother cheater in jail, crime news देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांची आई मुक्ता बोबडे यांना अडीच कोटींनी फसविणाऱ्या तापस घोषला आज न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

Accused of cheating Chief Justice's mother jailed | सरन्यायाधीशांच्या आईला फसविणारा आरोपी तुरुंगात

सरन्यायाधीशांच्या आईला फसविणारा आरोपी तुरुंगात

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांची आई मुक्ता बोबडे यांना अडीच कोटींनी फसविणाऱ्या तापस घोषला आज न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. फ्रेण्ड्स‌ कॉलनी निवासी ४९ वर्षीय तापस घोष याने पत्नीच्या मदतीने मुक्ता बोबडे यांच्याशी ठगबाजी केली होती. सीताबर्डी पोलिसांनी ८ डिसेंबरला या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. हे प्रकरण सर्वप्रथम लोकमतने उघडकीस आणले होते. बोबडे कुटुंबीयांचे आकाशवाणी चौकात सीझन्स लॉन आहे. या लॉनची मालकी मुक्ता बोबडे यांच्याकडे आहे. तापस लॉन मॅनेजर म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर लॉन भाड्याने देणे आणि देखभाल करण्याची जबाबदारी होती. तापसने खोटी कागदपत्रे बनवून फसवणूक केली. त्याने बोगस लोक उभे करून पैशाचे व्यवहार केल्याचा बनाव केला. अशा तऱ्हेने त्याने तीन ते चार वर्षात अडीच कोटी रुपयांची फेरफार केली. मुक्ता बोबडे ९४ वर्षांच्या असल्याने त्यांची बँकिंगची सर्व कामे तापसच करीत होता. बऱ्याच काळानंतर गैरव्यवहार होत असल्याचे बोबडे कुटुंबीयांना कळले. त्याअनुषंगाने त्यांची नातेवाईक किरण विष्णुपंत देवपुजारी यांनी २९ ऑगस्ट रोजी तक्रार नोंदविली. प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली. तपासानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी तापसला अटक केली आहे. त्याच्याकडून लॅपटॉप आणि अन्य दस्तऐवज प्राप्त झाले आहेत. ताब्याची मुदत संपल्यावर त्याची रवानगी आज न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Web Title: Accused of cheating Chief Justice's mother jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.