मंदिराची दानपेटी फोडणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:09 IST2021-07-29T04:09:31+5:302021-07-29T04:09:31+5:30

नागपूर : गोंदिया येथे मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रकमेची चोरी करणाऱ्या आरोपीस इतवारी लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी अटक केली. हर्ष ...

Accused of breaking temple donation box arrested | मंदिराची दानपेटी फोडणाऱ्या आरोपीस अटक

मंदिराची दानपेटी फोडणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर : गोंदिया येथे मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रकमेची चोरी करणाऱ्या आरोपीस इतवारी लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी अटक केली. हर्ष बनसोडे रा.गोंदिया असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

आरोपीने २७ जुलैच्या रात्री श्री सार्वजनिक काली मंदिर, गोंदिया या मंदिराचे दार तोडून मंदिरातील कॅमेरा, धार्मिक साहित्य आणि दानपेटीतील २,५०० रुपये चोरी केले. रक्कम घेऊन आरोपी नागपुरात आला. तो इतवारी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक सहावर संशयास्पदरीत्या फिरत होता. यावेळी प्लॅटफार्मवर गस्त घालत असलेले लोहमार्ग पोलीस अविनाश नन्नावरे, विजय सुखडे यांना त्याच्यावर शंका आली. त्याची चौकशी केली असता, त्याने कपडे खरेदी करण्यासाठी नागपूरला आल्याचे सांगितले, परंतु पोलिसांना शंका आल्यामुळे त्याची कठोर चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. याबाबत रामनगर गोंदिया ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, आरोपीला अटक केल्याची माहिती गोंदिया पोलिसांना दिल्यानंतर ते नागपुरात पोहोचले. इतवारी लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला गोंदिया पोलिसांच्या सुपुर्द केले. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

.............

Web Title: Accused of breaking temple donation box arrested