आर्थिक चणचणीमुळे कॉस्मेटिक्स व्यापारी बनला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST2021-02-05T04:51:54+5:302021-02-05T04:51:54+5:30

नागपूर : गारमेंट व्यापारी व त्याच्या मुलाचे अपहरण करून लुटणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने अटक केली आहे. अपहरण ...

The accused became a cosmetics trader due to financial difficulties | आर्थिक चणचणीमुळे कॉस्मेटिक्स व्यापारी बनला आरोपी

आर्थिक चणचणीमुळे कॉस्मेटिक्स व्यापारी बनला आरोपी

नागपूर : गारमेंट व्यापारी व त्याच्या मुलाचे अपहरण करून लुटणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने अटक केली आहे. अपहरण प्रकरणाचा सूत्रधार योगेश पालनकर याने आर्थिक चणचणीपोटी हे धाडस केले होते. पोलिसांनी आरोपी योगेशसह त्याचा साथीदार आकाश ऊर्फ आदिनाथ रावणकर व अर्जुन नायडे याला अटक केली आहे.

अपहरणाची घटना २१ जानेवारीच्या रात्री एसटी स्टॅण्डजवळ घडली होती. गोंदिया निवासी व्यापारी प्रवीण बजाज हे १४ वर्षीय मुलगा आर्यनसोबत खरेदी करण्यासाठी नागपुरात आले होते. ते एसटी स्टॅण्ड येथून आरोपींच्या कारमध्ये गोंदिया येथे जाण्यास रवाना झाले होते. आरोपी त्यांना बुटीबोरी घेऊन गेले. तेथे एअरगन दाखवून बजाजकडून ८७ हजार लुटून नेले. बजाज यांनी गोंदिया पोहोचल्यानंतर या घटनेची तक्रार दाखल केली. शनिवारी गणेशपेठ पोलिसांनी लूट व अपहरणाचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने आरोपींचा शोध सुरू केला.

योगेशचा कॉस्मेटिकचा व्यवसाय होता. लॉकडाऊनच्या काळात त्याचा व्यवसाय ठप्प पडला. त्याला दुकानही खाली करून द्यावे लागले. त्याने कर्ज घेऊन फ्लॅट व कार खरेदी केली होती. त्याचे हप्तेसुद्धा तो फेडू शकत नव्हता. दहा महिन्यापासून कॉस्मेटिक्सचे सामान त्याच्या घरीच पडून होते. त्याची एक्सपायरी डेट जवळ आली होती. योगेशला घर खर्च चालविणे कठीण झाले होते. त्याची आकाश रावणकर व अर्जुनसोबत मैत्री होती. आकाशच्या विरुद्ध पूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. त्याच्याजवळ एअरगनसुद्धा होती.

घटनेच्या दिवशी दोघे आर्थिक तंगी दूर करण्याचा मार्ग शोधत होते. आकाशने त्याला नागपुरातील एसटी स्टॅण्डजवळून प्रवासी बसवून लुटण्याची योजना आखली. त्यांनी बजाजला बघितल्यानंतर मोठा व्यापारी असल्याचे दिसून आले. त्यांनी २०० रुपयात गोंदियाला सोडून देण्याचे सांगून कारमध्ये बसविले. गोंदियाची बस सुटल्यामुळे बजाज आरोपींच्या गाडीत बसले. आरोपींनी ‘शॉर्टकट’ चा बहाणा करून भंडारा मार्गाकडून न जाता बजाज यांना वर्धा रोडकडे घेऊन गेले. तिथे बुटीबोरीजवळील एका शेतात त्यांना एअरगनच्या धाकावर लुटले. आरोपींना पीआय विनोद चौधरी यांच्या पथकाने अटक केली.

Web Title: The accused became a cosmetics trader due to financial difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.