शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आंघोळ करणाऱ्या अल्पवयीन मुलीची काढली चित्रफित, आरोपीस अटक

By दयानंद पाईकराव | Updated: April 15, 2023 15:31 IST

वेळीच लक्षात आल्यामुळे अनर्थ टळला

नागपूर : अल्पवयीन मुलगी आंघोळ करीत असताना वस्तीत राहणाºया आरोपीने ती आंघोळ करीत असताना चित्रफित तयार करून तिचा विनयभंग केला. ही घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सॅमवेल पिटर चाको (२८, कपिलनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो खासगी वाहनावर चालक म्हणून कामाला आहे. तर पिडीत १७ वर्षाची मुलगी शिक्षण घेत आहे. आरोपी पिडीत मुलीच्या वस्तीत राहतो. गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास पिडीत अल्पवयीन मुलगी आंघोळीला गेली होती. आरोपी ती आंघोळ करीत असताना चित्रफीत तयार करीत होता. ही बाब आंघोळ करीत असलेल्या पिडीत मुलीच्या लक्षात आली. लगेच तिने आपल्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.

चित्रफित तयार करून आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगरचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ (क), सहकलम १२ पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास कपिलनगर पोलिस करीत आहेत. वेळीच अल्पवयीन मुलीच्या लक्षात ही घटना आल्यामुळे अनर्थ टळला आहे, अन्यथा आरोपीकडून ती आंघोळ करतानाची चित्रफीत व्हायरल करण्याची दाट शक्यता होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरMolestationविनयभंग