शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्यातून पळाला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 21:53 IST

नागपूरकडे येत असलेल्या सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला प्रवाशांनी चोप देऊन नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु आयता आरोपी ताब्यात दिल्यानंतर त्याला सांभाळणे लोहमार्ग पोलिसांना जमले नाही. गुन्हा दाखल करीत असताना आरोपी त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. त्यानंतर लोहमार्ग पोलिसात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध लागला नाही. ठाण्यातून आरोपी पळून गेल्यामुळे लोहमार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. उलट अशा प्रकारची घटना घडलीच नसल्याचे सांगून या घटनेसंदर्भात लोहमार्ग पोलिसांनी माहिती देण्याचे टाळले.

ठळक मुद्देसेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये केली अल्पवयीन मुलीशी छेडखानी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरकडे येत असलेल्या सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला प्रवाशांनी चोप देऊन नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु आयता आरोपी ताब्यात दिल्यानंतर त्याला सांभाळणे लोहमार्ग पोलिसांना जमले नाही. गुन्हा दाखल करीत असताना आरोपी त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. त्यानंतर लोहमार्ग पोलिसात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध लागला नाही. ठाण्यातून आरोपी पळून गेल्यामुळे लोहमार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. उलट अशा प्रकारची घटना घडलीच नसल्याचे सांगून या घटनेसंदर्भात लोहमार्ग पोलिसांनी माहिती देण्याचे टाळले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेगाडी क्रमांक १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसच्या स्लिपर क्लास कोचमध्ये आरोपी आणि फिर्यादी प्रवास करीत होते. शेगाव रेल्वेस्थानकाजवळ आरोपीने ब्लँकेट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीची छेड काढली. मुलीने मदतीसाठी विरोध केला. त्यानंतर सहप्रवाशांनी आरोपीला पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर आरोपीला रेल्वे कर्मचाऱ्यांकडे सोपवून नागपूर लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. नागपुरात गाडी आल्यानंतर आरोपीला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. फिर्यादीचे कुटुंबीयही पोहोचले. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना आरोपी पोलिसांना चकमा देऊन पळाला. आरोपी पळाल्याचे समजताच लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत लोहमार्ग पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अशी घटना घडलीच नसल्याचे सांगितले.जबाबदार अधिकाऱ्यांनी केली दिशाभूललोहमार्ग पोलीस ठाण्यातून आरोपी पसार झाल्याची गंभीर घटना घडूनही लोहमार्ग पोलिसातील जबाबदार अधिकारी याबाबत काही बोलावयास तयार नव्हते. दिवसा कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस निरीक्षक गोंडाणे यांचा मोबाईल सायंकाळी स्विच ऑफ होता. अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले.इतवारी-कामठीत शोध, मुंबईला जाणार पोलीसआरोपीने पलायन केल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल टॉवरच्या लोकेशननुसार त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक इतवारी-कामठी परिसरात रवाना केले. तर आरोपी मुंबईला नोकरी करीत असल्यामुळे दुसरे पथक मुंबईला पाठविण्यात आल्याची माहिती आहे.आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना‘आरोपी लोहमार्ग पोलीस ठाण्यातून फरार झाला आहे. त्याला शोधण्यासाठी लोहमार्ग पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. उद्यापर्यंत आरोपीला शोधण्यात यश येईल.’अमोघ गावकर, लोहमार्ग पोलीस अधीक्षक

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस