प्रियकरावर अत्याचाराचा आरोप

By Admin | Updated: May 27, 2016 02:37 IST2016-05-27T02:37:14+5:302016-05-27T02:37:14+5:30

दोन वर्षांत अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर आता लग्नाला टाळाटाळ करणाऱ्या प्रियकराविरुद्ध तरुणीने बलात्काराचा आरोप लावला.

Accusations of atrocities on lover | प्रियकरावर अत्याचाराचा आरोप

प्रियकरावर अत्याचाराचा आरोप

नागपूर : दोन वर्षांत अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर आता लग्नाला टाळाटाळ करणाऱ्या प्रियकराविरुद्ध तरुणीने बलात्काराचा आरोप लावला. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे.
तक्रारदार तरुणी २५ वर्षांची आहे. एका वॉटर प्युरिफायर कंपनीत काम करणाऱ्या मोहन रामलू गुंटलवार (वय ३०, रा. मेकोसाबाग) या तरुणाशी दोन वर्षांपूर्वी तिचे प्र्रेमसंबंध जुळले. त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोन्हीकडच्या कुटुंबीयांना ही माहिती कळाल्यानंतर प्रारंभी थोडा विरोध झाला. मात्र, दोघेही आपल्या लग्नाच्या निर्णयावर ठाम असल्याने दोघांच्याही पालकांनी लग्नाला होकार दर्शविला. त्यामुळे त्यांच्यातील संबंध अधिकच दृढ झाले.
तरुणीला मोहन मनात येईल त्या ठिकाणी घेऊन जायचा आणि तेथे हे दोघे शरीरसंबंध प्रस्थापित करायचे. अशा प्रकारे ३० जून २०१४ पासून त्यांच्यात अनेकदा शरीरसंबंध आले. दरम्यान, मोहनचे काम सुटले. त्यामुळे लग्नाचा विषय निघताच तो नोकरी मिळाल्यावर लग्न करू, असे सांगू लागला. नंतर नवनवीन कारणे सांगू लागला.
अलीकडे त्याने आपल्या प्रेयसीचा फोन उचलणेच बंद केले. त्याच्या घरी गेली तेव्हा तिला अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यामुळे तरुणीने सरळ गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी मोहनविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल गाडेकर पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Accusations of atrocities on lover