शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात यंदाचा पावसाळा होणार दमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:03 IST

महाराष्ट्रात पुरेसा पाऊस : सरासरीपेक्षा १०३ टक्के पावसाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात यंदा दमदार पाऊस बरसणार असून, मान्सूनचा हंगाम सामान्य राहील, असा अंदाज स्कायमेट या हवामानविषयक अंदाज वर्तविणाऱ्या खासगी संस्थेने वर्तविला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात ८६८.८ मीलीमीटर म्हणजेच सरासरीच्या १०३ टक्के पाऊस होईल, असाही अंदाज आहे.

स्कायमेटने जाहीर केलेल्या अंदाजात मान्सूनवर विपरित परिणाम करणाऱ्या एल निनोची शक्यता नाकारली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये ला निनो कमजोर असेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. ला निनो कमकुवत असल्यास आणि एल निनोचा प्रभाव नसेल, तर मान्सूनचा पाऊस जोरदार बरसत असतो. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो, असेही स्कायमेटने म्हटले आहे. पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा तर पश्चिम घाटात म्हणजेच प्रामुख्याने केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. उत्तरेकडील राज्ये आणि पर्वतीय भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यताही स्कायमेटने वर्तविली आहे. 

जूनमध्ये देशात दीर्घकालीन सरासरीच्या ९६ टक्के म्हणजेच १६५.३ मीमी, जुलैमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या १०२ टक्के म्हणजेच २८०.५ मीमी, ऑगस्टमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या १०८ टक्के म्हणजेच २५४.९ मीमी आणि सप्टेंबरमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या १०४ टक्के म्हणजेच १६७.९ मीमी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे अंदाजात वर्तविले आहे.

हवामान विभागाने अद्याप जाहीर केला नाही पूर्वानुमानस्कायमेट या खासगी संस्थेने यंदाचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला असला, तरी भारतीय हवामान विभागाने २०२५ मधील मान्सूनचे पूर्वानुमान अद्याप जाहीर केलेले नाही. विभागाकडून साधारणतः मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला अंदाज जाहीर केला जातो, परंतु या वर्षी एल निनोची स्थिती 'न्यूट्रल' राहाण्याची शक्यता असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे मान्सून सामान्य राहाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मात्र मान्सूनबाबत आताच भाकीत करणे घाईचे ठरेल, असे स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :RainपाऊसMonsoon forecastमोसमी पावसाचा अंदाजnagpurनागपूर