शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

नवीन घटनेनुसार आज पहिल्यांदा गुप्त मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 9:39 PM

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक ४ मार्च रोजी होत आहे. २०१८-२०२३ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नागपुरातून तीन जागांकरिता सात उमेदवार रिंगणात जोर आजमावत आहेत़ ही निवडणूक २५ आॅक्टोबर २०१७ पासून अमलात आलेल्या नवीन घटनेप्रमाणे होणार असल्याने, यंदा पहिल्यांदाच नागपुरातील रंगकर्मी गुप्त मतदान करणार आहेत.

ठळक मुद्देनाट्य परिषद निवडणूक : तीन जागांसाठी सात उमेदवार रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक ४ मार्च रोजी होत आहे. २०१८-२०२३ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नागपुरातून तीन जागांकरिता सात उमेदवार रिंगणात जोर आजमावत आहेत़ ही निवडणूक २५ आॅक्टोबर २०१७ पासून अमलात आलेल्या नवीन घटनेप्रमाणे होणार असल्याने, यंदा पहिल्यांदाच नागपुरातील रंगकर्मी गुप्त मतदान करणार आहेत. नागपुरात महानगर शाखेचे ८९१ आणि नागपूर शाखेचे १०० असे एकूण ९९१ सदस्य आहेत़ हेच सदस्य नागपुरातून तीन सदस्यांच्या जय-पराजयाचा फैसला करणार आहेत़ शहरातील रंगकर्मींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महानगर व नागपूर अशा दोन्ही शाखांचे सदस्य मैदानात आहेत. यामध्ये रंगसेवक पॅनलचे अनिल चणाखेकर, सलीम शेख तर नागपूर शाखेचे नरेश गडेकर, शेखर बेंद्रे, प्रमोद भुसारी यांच्याशिवाय दिलीप देवरणकर व दिलीप ठाणेकर हे स्वतंत्र उमेदवारसुद्धा मध्यवर्तीत जाण्यास उत्सुक आहेत. नागपुरातील मतदार यातील कुणाच्या बाजूने कौल देतात, याकडे नाट्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे.विदर्भातून एकूण सात सदस्य निवडले जाणारनाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचा इतिहास पाहिला तर नियामक मंडळावर कायम मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे याच भागाचा वरचष्मा असायचा़ परंतु २५ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या घटनादुरुस्तीनंतर आता उर्वरित महाराष्ट्रालाही या निवडणुकीच्या अनुषंगाने योग्य प्रमाणात भागीदारी मिळणार आहे़ मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे येथून २० उमेदवार निवडून जाणार आहेत, तर विदर्भातून नागपूर (३), अकोला (२) व वाशिम, मानोरा, बुलडाणा यांचे एकत्रित दोन असे एकूण सात सदस्य आणि उर्वरित महाराष्ट्रातून ३३ आणि घटक संस्थांचे १० सदस्य निवडले जाणार आहेत़ हेच सदस्य पुढे अध्यक्षासह केंद्रीय कार्यकारिणीची निवड करणार असल्याने, या निवडणुकीला एक वेगळे वलय लाभले आहे.१८ मतदारांची दोन्ही शाखेत नोंदणीनागपुरातील ९९१ सदस्यांपैकी १८ सदस्य असे आहेत ज्यांच्या नावाची दोन्ही शाखेत नोंदणी आहे. हे १८ जण दोन्ही शाखांचे सदस्य कसे झाले, त्यांच्या नावांना मध्यवर्ती शाखेने मंजुरी कशी दिली, या निवडणुकीत ही मंडळी जे मतदान करणार आहेत ती मते बाद तर ठरणार नाहीत ना, यावरही या निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार चर्चा सुरू झाली आहे.या निवडणुकीत मतदारांनी मतदान केंद्रावर आपले ओळखपत्र दाखवून मतदान करायचे आहे. नवीन घटना दुरुस्तीमुळे या वेळी मतदानात गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून या निवडणुकीचा निकाल बुधवारी ७  मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयात जाहीर केला जाणार आहे. 

टॅग्स :marathiमराठीElectionनिवडणूक