सरकारच्या तरतुदीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार केवळ ८०६ रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:11 PM2019-12-19T23:11:23+5:302019-12-19T23:12:39+5:30

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेली आर्थिक तरतूद अतिशय कमी असल्याची टीका करीत तरतूद केल्यानुसार शेतकऱ्याला मदत केली गेली तर अतिवृष्टीमुळे प्रभावित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर केवळ ८०६ रुपये मिळतील, असा दावा भाजपतर्फे करण्यात आला.

According to the government provision, each farmer will get only Rs806 | सरकारच्या तरतुदीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार केवळ ८०६ रूपये

सरकारच्या तरतुदीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार केवळ ८०६ रूपये

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या मदतीसाठी अल्प तरतुदीचा आरोप : पुरवणी मागण्यांवर भाजप आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने सादर केलेल्या १६ हजार ९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना भाजपच्या सदस्यांनी गुरुवारी विधानसभेत तीव्र विरोध केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेली आर्थिक तरतूद अतिशय कमी असल्याची टीका करीत तरतूद केल्यानुसार शेतकऱ्याला मदत केली गेली तर अतिवृष्टीमुळे प्रभावित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर केवळ ८०६ रुपये मिळतील, असा दावा भाजपतर्फे करण्यात आला.
गुरुवारी भाजपतर्फे संजय कुटे यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात केली. ते म्हणाले, पुरवणी मागण्यांमध्ये जुन्या योजना व केंद्राच्या योजनांसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. तीन पक्षाच्या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी काहीही केले नाही. हा शेतकऱ्यांसोबत विश्वासघात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सज्जन व्यक्ती आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना फसविले. ते त्यांना पक्ष प्रमुखाची भूमिका सोडून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत येऊ देत नाही. ते म्हणाले, शिवसेनेच्या आमदाराने ‘हवामानात बदल’ यावर विशेष सत्र बोलावण्याची मागणी केली आहे. परंतु पुरवणी मागण्यांमध्ये याचा कुठलाही उल्लेख नाही. मेट्रो रेलसाठी आरे कार शेडसह अनेक विकास कामांवर स्थगनादेश दिला आहे.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नवाब मलिक यांनी चर्चेदरम्यान सांगितले की, संजय कुटे यांनी पुरवणी मागण्यांचा विषय व क्रमांकाचा उल्लेख केलेला नाही. यावर कुटे म्हणाले, मी विषय व क्रमांकाचा उल्लेख केला आहे. रेकॉर्ड तपासून पाहू शकता. जर मलिक यांचे म्हणणे खोटे ठरले तर त्यांनी राजीनामा द्यावा. परंतु मलिक यांनी पुन्हा आपले म्हणणे मांडत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावर भाजपचे सदस्य नारेबाजी करू लागले. तालिका अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य रेकॉर्डमधून काढण्याची घोषणा केल्यावरच विरोधी पक्षाचे सदस्य शांत झाले.

भाजप-शिवसेनेत जुंपली
पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान भाजप व शिवसेनेच्या सदस्यांमध्ये जुंपली. विशेषत: मुंबईतील आमदार आक्रमक होते. आरेमध्ये मेट्रो कारशेडला दिलेल्या स्थगितीवरून जोरदार वाद झाला. माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी, आरेच्या जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर भाजपचे सदस्य म्हणाले की, ते मागच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होेते तेव्हा त्यांनी अतिक्रमणाचा प्रश्न का सोडवला नाही. वायकर यांनी राज्यमंत्री असल्याचा हवाला दिला, तेव्हा अशा परिस्थितीत त्यांनी राजीनामा का दिला नाही, असा प्रश्न भाजपच्या सदस्यांनी विचारला. यादरम्यान झालेल्या चर्चेत शिवसेनेचे सुनील प्रभू, भाजपचे आशिष शेलार, अतुल भातखलकर आदी सहभागी झाले होते.

Web Title: According to the government provision, each farmer will get only Rs806

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.