अपघात व प्रदूषणमुक्त नागपूर

By Admin | Updated: April 24, 2016 02:53 IST2016-04-24T02:53:28+5:302016-04-24T02:53:28+5:30

देशासोबतच नागपूर व परिसरातील वाढते रस्ते अपघात हा चिंतेचा विषय आहे.

Accidents and pollution free Nagpur | अपघात व प्रदूषणमुक्त नागपूर

अपघात व प्रदूषणमुक्त नागपूर

नितीन गडकरी यांचा संकल्प : जिल्ह्याच्या विकासासाठी १८ हजार कोटींचा निधी मंजूर
नागपूर : देशासोबतच नागपूर व परिसरातील वाढते रस्ते अपघात हा चिंतेचा विषय आहे. नागपुरातील अपघात होणारी स्थळे शोधून तेथे उपाययोजना करण्यात येणार आहे आणि शहरातील रस्त्यांचादेखील ‘मेकओव्हर’ करण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी प्रयत्न राहणार असून खऱ्या अर्थाने उपराजधानीला अपघातमुक्त व प्रदूषणमुक्त शहर करण्याचा संकल्प घेतला असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान गडकरी यांनी नागपूर विकासाच्या ‘व्हिजन’वर प्रकाश टाकला. (सविस्तर पान/२)

‘मेट्रो’चा बुटीबोरी, कळमेश्वरपर्यंत होणार विस्तार
नागपुरात ‘मेट्रो रेल्वे’च्या कामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात ‘मेट्रो रेल्वे’ विमानतळापासून लंडनस्ट्रीट, एमआयडीसी, हिंगणा, वाडी, व्हेरायटी चौक, कामठी, कन्हानपर्यंत चालविण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात बुटीबोरी व कळमेश्वरपर्यंत याचा विस्तार करण्यात येईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. जर्मनीची आर्थिक संस्था ‘केएफडब्लू’ निधी देण्यासाठी तयार आहे. ‘मेट्रो’साठी आवश्यक असलेल्या ७७ टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले असून विविध कामांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. नागपूर मेट्रो रेल्वे प्रोजेक्टच्या निर्माणकार्यात १५०० कोटी रुपयांची बचत करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेदेखील त्यांनी सांगितले.

गडकरी यांचे संकल्प
दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव उपलब्ध करून देणे
शहराला मोतीबिंदूमुक्त करणे
शहरात जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करणे
विधानसभानिहाय रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे
पिण्याच्या पाण्याची २४ बाय ७ योजना प्रभावीपणे राबविणे
शहरातील उद्याने, तलाव, स्मशानभूमी सौंदर्यीकरण करणे
गरिबांना ५०० रुपयांत ‘डायलिसिस’ची सुविधा देणार.

Web Title: Accidents and pollution free Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.