शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

सिंगापूरला जाणाऱ्या विमानाचे नागपुरात आकस्मिक लँडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 12:51 AM

मुंबईहून सिंगापूरला जाणाऱ्या एका विमानात अचानक बिघाड आल्याने बुधवारी पहाटे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

ठळक मुद्देप्रवाशांचा रात्री विमानातच मुक्काम :सायंकाळपर्यंत झाली नाही दुरुस्ती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबईहून सिंगापूरला जाणाऱ्या एका विमानात अचानक बिघाड आल्याने बुधवारी पहाटे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरल्यानंतर प्रवाशांना विमानातच ठेवण्यात आले. दरम्यान बुधवारी पहाटे ७ वाजताच्या दरम्यान सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने सिंगापूरकडे रवाना केले.मिळालेल्या माहितीनुसार इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाईट ६ ई १९ हे विमान मंगळवारी रात्री १.३५ वाजता मुंबईहून सिंगापूरसाठी रवाना झाले. विमानाने उडाण घेतल्यानंतर चालकदलाला विमानात काहीतरी बिघाड असल्याची जाणीव झाली. चालक दलाने नागपूर एटीसीकडे इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली व ती मिळाल्यानंतर बुधवारी पहाटे ३.३० वाजता हे विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. सूत्राच्या माहितीनुसार विमान उतरविल्यानंतर येथील प्रवाशांना टर्मिनल बिल्डींगमध्ये आणण्यात आले नाही. प्रवाशांना विमानातच थांबविण्यात आले. त्यानंतर विमान कंपनीद्वारे हैदराबादहून रिकामे विमान बोलविण्यात आले. पहाटे ६.३० वाजताच्या दरम्यान सर्व प्रवाशांना खराब विमानातून आलेल्या विमानात बसविण्यात आले व ७ वाजता फ्लाईट सिंगापूरकडे रवाना करण्यात आली. बिघडलेल्या विमानाची सायंकाळपर्यंत दुरुस्ती होऊ शकली नसल्याने ते विमानतळावर उभे होते. विमानाबाबत माहितीसाठी इंडिगो एअरलाईन्सशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून माहिती मिळू शकली नाही.जी-९ आता आठवड्यातून दोनदाएअर अरेबियाच्या नागपूर-शारजाह-नागपूर फ्लाईटच्या शेड्युलमध्य १ जानेवारीपासून बदल करण्यात आला आहे. फ्लाईट जी ९-४१५ आता शुक्रवार आणि रविवार अशी आठवड्यातून दोनदा करण्यात आली आहे. मात्र विमानाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला नाही. हे विमान रात्री ३.४५ ला नागपूर विमानतळावर पोहचेल आणि पहाटे ४.४५ वाजता शारजाहसाठी रवाना होईल. ही फ्लाईट आतापर्यंत मंगळवार, बुधवार व शुक्रवारी संचालित करण्यात येत होती.

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर