शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:15 IST

दुचाकीला स्टार बसच्या चालकाने धडक दिल्यामुळे लग्नाला निघालेल्या प्रणय संतोष वाघ (वय २४, रा. मनीषनगर) याचा करुण अंत झाला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास भंडारा मार्गावरील एका मद्याच्या दुकानासमोर हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देस्टारबसच्या चालकाने घेतला बळी : कळमन्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकीला स्टार बसच्या चालकाने धडक दिल्यामुळे लग्नाला निघालेल्या प्रणय संतोष वाघ (वय २४, रा. मनीषनगर) याचा करुण अंत झाला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास भंडारा मार्गावरील एका मद्याच्या दुकानासमोर हा भीषण अपघात घडला.प्रणय अ‍ॅक्टिव्हाने तर त्याचे मित्र राहुल भावराव कवडती (वय २४, रा. श्रीशरणनगर, प्रतापनगर) आणि कुलदीप गाऊत्रे (वय २४) हे दोघे पल्सरने त्यांच्या मित्राच्या लग्नसमारंभासाठी गुरुवारी सकाळी तिरोडा (जि. भंडारा) येथे जात होते. भंडारा मार्गावरील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोखर वाईन शॉपजवळ एमएच ४०/ बीजे १९५५ क्रमांकाच्या आरोपी स्टार बसचालकाने प्रणयच्या अ‍ॅक्टिव्हाला जोरदार धडक मारली. त्यामुळे प्रणयचा करुण अंत झाला. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच कळमना पोलिसांनी धाव घेतली. अपघातस्थळाचे वातावरण निवळल्यानंतर पोलिसांनी आरोपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.लग्नसमारंभात शोककळाप्रणयच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच लग्नसमारंभाच्या ठिकाणी शोककळा पसरली. त्याचे अनेक मित्र मोठ्या संख्येत कळमन्यात पोहचले. या अपघातामुळे प्रणयच्या निवासस्थान परिसरातही तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर