तरुणाचा अपघाती मृत्यू, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:24+5:302021-02-05T04:43:24+5:30
काेंढाळी : भरधाव दुचाकी रस्त्यालगतच्या दगडावर आदळली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालक तरुणाचा मृत्यू झाला तर साेबत असलेला किरकाेळ ...

तरुणाचा अपघाती मृत्यू, एक जखमी
काेंढाळी : भरधाव दुचाकी रस्त्यालगतच्या दगडावर आदळली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालक तरुणाचा मृत्यू झाला तर साेबत असलेला किरकाेळ जखमी झाला. ही घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
गाेलू पाटील (२७, रा. नागसेन वन, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव असून, प्रशांत प्रमाेद देशभ्रतार (२२, रा. नागसेन वन, नागपूर) असे जखमीचे नाव आहे. मृत गाेलू व त्याचा मित्र प्रशांत हे दाेघेही एमएच-४९/वाय-२२६५ क्रमांकाच्या ॲक्टिव्हा दुचाकीने नागपूर ते सेलू (वर्धा) येथे काेंढाळी मार्गे जात हाेते. दरम्यान, खैरी परिसरात गाेलूचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यालगतच्या दगडावर आदळली. यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने गाेलूचा मृत्यू झाला तर प्रशांत किरकाेळ जखमी झाला. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक राम ढगे करीत आहेत.