तरुणाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:08 IST2021-04-28T04:08:37+5:302021-04-28T04:08:37+5:30

बुटीबाेरी : राेडवर बॅरिकेटिंगकरिता ठेवलेल्या सिमेंट दगडावर भरधाव दुचाकीे धडकली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ...

Accidental death of a young man | तरुणाचा अपघाती मृत्यू

तरुणाचा अपघाती मृत्यू

बुटीबाेरी : राेडवर बॅरिकेटिंगकरिता ठेवलेल्या सिमेंट दगडावर भरधाव दुचाकीे धडकली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आसाेला सावंगी येथे रविवारी (दि.२५) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

दीपक गंगाप्रसाद शर्मा (३२, रा. सेमिनरी हिल्स, गांधी पुतळाजवळ, सुरेंद्रगड, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. दीपक हा आपल्या एमएच-३१/ईएस-४७६९ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना, आसाेला सावंगी परिसरात राेडवर बॅरिकेटिंगकरिता ठेवलेल्या सिमेंट दगडावर त्याची दुचाकी धडकली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दीपकचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवशंकर ओमप्रकाश कहार (३६, रा. प्लाॅट नं. ३३, वैशाली अपार्टमेंट, शिवाजी काॅम्प्लेक्स, नागपूर) यांच्या तक्रारीवरून बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनटक्के करीत आहेत.

Web Title: Accidental death of a young man