महिलेचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:08 IST2020-12-29T04:08:56+5:302020-12-29T04:08:56+5:30

काेंढाळी : खड्ड्यातून माेटरसायकल उसळल्याने मागे बसलेली महिला खाली पडली व गंभीर जखमी झाली. पुढे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

Accidental death of a woman | महिलेचा अपघाती मृत्यू

महिलेचा अपघाती मृत्यू

काेंढाळी : खड्ड्यातून माेटरसायकल उसळल्याने मागे बसलेली महिला खाली पडली व गंभीर जखमी झाली. पुढे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जामगड शिवारात घडली.

कुसुम श्रीपत मुंगभाते (४५, रा. जामगड) असे मृत महिलेचे नाव आहे. ती प्रमेश ओमकार पटले (२१, रा. घुबडीगाेंडी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) याच्यासाेबत एमएच-३१/डीवाय-२३१३ क्रमांकाच्या माेटरसायकलवर मागे बसून जात हाेती. राेडवरील खड्ड्यातून माेटरसायकल उसळली आणि ती खाली काेसळली. त्यात गंभीर दुखापतीमुळे तिला नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. तिथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी काेंढाळी पाेलिससांनी भादंवि२७९, ३०४ (अ) अन्वये गुनहा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक साेनावले करीत आहेत.

Web Title: Accidental death of a woman