दोन शिक्षकांचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: January 10, 2015 02:45 IST2015-01-10T02:45:10+5:302015-01-10T02:45:10+5:30
पार्टी करून गावाकडे निघालेल्या श्क्षिकांची भरधाव कार उलटल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील दोन शिक्षकांचा करुण अंत झाला. तर, तिघे गंभीर जखमी आहेत.

दोन शिक्षकांचा अपघाती मृत्यू
कोंढाळी/नागपूर : पार्टी करून गावाकडे निघालेल्या श्क्षिकांची भरधाव कार उलटल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील दोन शिक्षकांचा करुण अंत झाला. तर, तिघे गंभीर जखमी आहेत. आज रात्री पावणेअकराच्या सुमारास नागपूर - अमरावती महामार्गावर कोंढाळीजवळ हा भीषण अपघात घडला.
कारंजा (घाडगे) येथील मॉडेल हायस्कूलमधील काही शिक्षकांनी आज रात्री पार्टीचे आयोजन केले होते. त्यानुसार, प्रशांत ढगे (वय ३५), अमोल वलगावकर (वय २८) तसेच निलेश जवंजाळ (वय ३२), सचिन चौथाळे (वय ३५) आणि जयेंद्र बागडे (वय ४०) हे शिक्षक कोंढाळी जवळच्या कलकत्ता ढाबा येथे आले. रात्री खाणे -पिणे झाल्यानंतर ते रिट्ज कारने (एमएच ३२/ ७९९४) परत कारंजाकडे निघाले. कोंढाळीच्या पुढे १५ ते २० किलोमिटर अंतरावरील त्रिवेणी ढाब्याजवळ भरधाव कार उलटली. परिणामी प्रशांत आणि अमोलचा मृत्यू झाला. तर, निलेश, सचिन आणि जयेंद्र हे तिघे गंभीर जखमी झाले. रस्त्याने जाणा-या काही सदगृहस्थांनी त्यांना मदतीचा हात दिला.
या सर्वांना कोंढाळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉ. तिवारी यांनी त्यांना नागपूरला उपचारार्थ रवाना केले. (प्रतिनिधी)