शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

नागपुरात विविध भागात सहा जणांचा आकस्मिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 20:09 IST

शहरातील विविध भागात सहा व्यक्तींचा आकस्मिक मृत्यू झाला. प्रतापनगर, जरीपटका, वाठोडा, कळमना, अजनी आणि पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विविध भागात सहा व्यक्तींचा आकस्मिक मृत्यू झाला. प्रतापनगर, जरीपटका, वाठोडा, कळमना, अजनी आणि पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.प्रतापनगरातील पांडे ले-आऊटमध्ये राहणारे संजय गजानन पात्रीकर (वय ५९) हे सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास चक्कर येऊन खाली पडले. त्यांना उपचाराकरिता मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सायली संजय पात्रीकर (वय २४) यांनी प्रतापनगर पोलिसांना ही माहिती कळविली.जरीपटक्यातील बेझनबागमध्ये राहणारे चंद्रमणी केशवराव कावळे (वय ४५) यांची सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास प्रकृती खराब झाली. त्यांना उपचारासाठी मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.अजनीतील पार्वतीनगरात राहणारे हरी उरकुडा तागडे (वय ९६) यांची प्रकृती खराब झाल्याने सोमवारी रात्री ७ च्या सुमारास त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनगवळी बाबा नगरात राहणारे हरीश वासुदेव जानवे ( वय २५) हे सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घरात बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना उपचाराकरिता मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.वाठोड्यातील रामकृष्ण नगरात राहणाऱ्या रजनी मोहन सपाटे शेजाऱ्यांसोबत बोलत उभ्या असताना सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आल्याने त्या खाली पडल्या. त्यांनी आरडाओरड करून शेजाºयांना गोळा केले. त्यांना उपचाराकरता मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी ले-आउट वांजरा या भागातील नाल्याच्या काठावर कृष्णा सदाशिव मोटघरे हे बेशुद्ध अवस्थेत आढळले. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांना उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. उपरोक्त सर्व प्रकरणांत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर