सिक्युरिटी गार्डचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:37+5:302021-01-16T04:11:37+5:30

नंदनवनमध्ये अपघात, आरोपी फरार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पल्सरचालकाने जोरदार धडक दिल्याने दुसऱ्या दुचाकीवरील सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाला. ...

Accidental death of a security guard | सिक्युरिटी गार्डचा अपघाती मृत्यू

सिक्युरिटी गार्डचा अपघाती मृत्यू

नंदनवनमध्ये अपघात, आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - पल्सरचालकाने जोरदार धडक दिल्याने दुसऱ्या दुचाकीवरील सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाला. अमोल सोमाजी धावडे (वय ३५) असे मृतकाचे नाव असून ते पारडीच्या सोनबानगरात राहत होते. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री हा अपघात घडला.

धावडे आणि प्रशांत गोपीचंद चरडे (वय ३०) हे दोघे दुचाकीने गुरुवारी रात्री ७.४५ च्या सुमारास नंदनवनमधून जात होते. गंगाबाई घाटचाैकाजवळ प्रशांतच्या डोळ्यासमोर अचानक काही तरी आल्याने त्याने दुचाकी थांबवली. तेवढ्यात वेगात आलेल्या पल्सर (एमएच ४०य एझेड ६३५८) च्या चालकाने चरडेच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. यात चरडे आणि धावडे दोघेही खाली पडले. अपघातानंतर आरोपी पल्सरचालक पळून गेला.

गंभीर जखमी झालेल्या धावडेला नंदनवनमधील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी धावडेला मृत घोषित केले. प्रशांत चरडे यांच्या तक्रारीवरून नंदनवनचे सहायक पोलीस निरीक्षक शिर्के यांनी आरोपी पल्सरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.

हेल्मेटमुळे चरडे बचावले

दुचाकीचालक प्रशांत चरडे हे हेल्मेट घालून होते. त्यामुळे या अपघातात ते खाली पडूनही डोक्याला दुखापत झाली नाही, म्हणून ते बचावले. धावडेंनी मात्र हेल्मेट घातले नसल्याने त्यांचा जीव गेला.

Web Title: Accidental death of a security guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.