अजनीतील खेळाडूचा आकस्मिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:09 IST2021-01-19T04:09:53+5:302021-01-19T04:09:53+5:30
---- नाल्यात मृतदेह आढळला नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमवारी सकाळी शिवनगरातील नाल्यात एका ५५ ते ६० वर्षे ...

अजनीतील खेळाडूचा आकस्मिक मृत्यू
----
नाल्यात मृतदेह आढळला
नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमवारी सकाळी शिवनगरातील नाल्यात एका ५५ ते ६० वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. अमितकुमार जितेंद्र यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. हा अपघात आहे की हत्या, याची पोलीस चौकशी करीत आहेत.
----
कुख्यात गुंड अजय पोहाणेविरुद्ध एमपीडीए
नागपूर : रामबागमधील कुख्यात गुंड अजय प्रभाकर पोहाणे (वय ४५) याच्याविरुद्ध पोलिसांनी एमपीडीए लावून त्याला कारागृहात डांबले. कुख्यात पोहाणे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते लक्षात घेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोहाणेविरुद्ध एमपीडीएचा आदेश सोमवारी जारी केला. त्यानंतर इमामवाडा पोलिसांनी त्याला अटक करून कारागृहात डांबले. त्याची नाशिकच्या कारागृहात रवानगी केली जाणार आहे.
----