वृद्धेचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST2020-12-06T04:08:36+5:302020-12-06T04:08:36+5:30

नागपूर : मुलाच्या दुचाकीवर बसून निघालेल्या वृद्धेचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. सुंदराबाई सातोबाजी देऊळकर (वय ६६) असे मृत ...

Accidental death of an old man | वृद्धेचा अपघाती मृत्यू

वृद्धेचा अपघाती मृत्यू

नागपूर : मुलाच्या दुचाकीवर बसून निघालेल्या वृद्धेचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. सुंदराबाई सातोबाजी देऊळकर (वय ६६) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या त्यांचा मुलगा राजेशच्या दुचाकीवर बसून २५ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता जात असताना म्हाळगीनगर चौकात चक्कर आल्याने खाली पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे शुक्रवारी रात्री डॉक्टरांनी सुंदराबाई यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

---

सिक्युरिटी गार्ड दगावला

नागपूर : कर्तव्यावर असताना चक्कर येऊन पडल्याने एका सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बिस्कीट कंपनीसमोर ही घटना घडली. संजू काशिनाथ नेवारे (वय ४८, रा. लक्ष्मीनारायण नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

--

Web Title: Accidental death of an old man