खाण कामगाराचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:11 IST2021-02-23T04:11:15+5:302021-02-23T04:11:15+5:30
कुही : गिट्टी खाणीमध्ये क्रशर मशीनच्या कन्व्हेअर बेल्टमध्ये कामगाराच्या गळ्यातील दुपट्टा अडकला. त्यात गंभीर जखमी झाल्याने तरुण खाण कामगाराचा ...

खाण कामगाराचा अपघाती मृत्यू
कुही : गिट्टी खाणीमध्ये क्रशर मशीनच्या कन्व्हेअर बेल्टमध्ये कामगाराच्या गळ्यातील दुपट्टा अडकला. त्यात गंभीर जखमी झाल्याने तरुण खाण कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सांभारे खदान उटी येथे शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
संताेष महेंद्र सिंह (२१, रा. ग्राम भंडार, ता. धुरकी, जि. गढवा (झारखंड) हल्ली मु. दिलीप सवारे गिट्टीखदान सर्व्हिस क्वाॅर्टर, ता. कुही) असे मृत कामगाराचे नाव आहे. मृत संताेष हा गिट्टी खाण येथे मजुरीचे काम करीत हाेता. ताे कन्व्हेअर बेल्ट पाहण्याकरिता गेला असता, अचानक त्याच्या गळ्यातील दुपट्टा बेल्टमध्ये अडकला. यात ताे मशीनमध्ये ओढला गेल्याने त्याला गंभीररीत्या दुखापत झाली. लागलीच त्याला प्रथम कामठीतील खासगी दवाखान्यात व त्यानंतर नागपूर मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी बाबूलाल कुमार जितनसिंह (२०) याच्या तक्रारीवरून कुही पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक चंद्रकांत मदने करीत आहेत.