पान विक्रेत्याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST2020-12-02T04:10:06+5:302020-12-02T04:10:06+5:30

पिपळा (केवळराम) : पानाची विक्री करण्यासाठी जात असलेल्या विक्रेत्याच्या ॲक्टिव्हाला विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या बाेलेराेने जाेरात धडक दिली. त्यात ...

Accidental death of a leaf seller | पान विक्रेत्याचा अपघाती मृत्यू

पान विक्रेत्याचा अपघाती मृत्यू

पिपळा (केवळराम) : पानाची विक्री करण्यासाठी जात असलेल्या विक्रेत्याच्या ॲक्टिव्हाला विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या बाेलेराेने जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव-सावनेर मार्गावरील पिपळा (केवळराम) शिवारातील वळणावर रविवारी (दि. २९) सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली.

अरुण कृष्णराव वसुले (५५, रा. सावरगाव, ता. नरखेड) असे मृताचे नाव आहे. ते नेहमीप्रमाणे त्यांच्या एमएच-४०/एव्ही-११८२ क्रमांकाच्या माेटरसायकलने पाने विकण्यासाठी सावरगावहून नांदागाेमुख (ता. सावनेर) येथे जात हाेते. दरम्यान, पिपळा (केवळराम) शिवारातील वळणावर सावरगावच्या दिशेने वेगात जाणाऱ्या एमएच-४०/वाय-७७८० क्रमांकाच्या बाेलेराेने त्यांच्या ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली आणि बाेलेराे निघून गेली.

त्यांचे डाेके डांबरी राेडवर आदळल्याने गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी बाेलेराे चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस कर्मचारी भुक्ते करीत आहेत.

Web Title: Accidental death of a leaf seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.