शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

घरकाम करणाऱ्या महिलेचा अकस्मात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 20:20 IST

घरकाम करणाऱ्या एका महिलेचा काम करता करताच मृत्यू झाला.लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धमाननगरात बुधवारी दुपारी ही घटना घडली.

ठळक मुद्देकाम करता करताच तिने घेतला शेवटचा श्वास : नागपूरच्या वर्धमाननगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरकाम करणाऱ्या एका महिलेचा काम करता करताच मृत्यू झाला. विमलबाई प्रभाकर पोपाटे (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धमाननगरात बुधवारी दुपारी ही घटना घडली.विमलबाई कळमन्यातील डिप्टी सिग्नल भागात राहत होत्या. त्या वर्धमाननगरातील पशू खाद्य विकणारे निरंजन सुभाष काळे यांच्याकडे चार वर्षांपासून घरकाम करायच्या. काळे हे एकटेच घरी राहतात. विमलबाई त्यांची विश्वासपात्र होती. त्यामुळे काळेच्या घराच्या खालच्या रूमची चावी त्यांच्याकडे राहायची. गेल्या काही दिवसांपासून त्यांना बरे वाटत नव्हते. त्यांनी तसे घरच्यांना, सोबत काम करणाऱ्या महिलेला आणि काळे यांनाही सांगितले होते. मात्र, गरिबीमुळे विमलबाईला रोज कामावर जावे लागत होते. बुधवारी दुपारी एका महिलेसह विमलबाई काळेच्या घरी कामाला आल्या. सोबतच्या महिलेने तिचे काम केले आणि ती निघून गेली. विमलबाई खाली साफसफाई करत असताना वरच्या माळ्यावर राहणाऱ्या काळेंनी त्यांना दुपारी १२ च्या सुमारास आंघोळीसाठी पाणी गरम करण्यास सांगितले. दुपारी १ च्या दरम्यान काळे खाली आले असता विमलबाई निपचित पडून दिसल्या. काळेंनी त्यांना आवाज देऊन उठविण्याचे प्रयत्न केले. हालचाल करीत नसल्याचे बघून आजूबाजूच्यांना गोळा केले. लकडगंज पोलिसांनाही माहिती दिली. एएसआय उपाध्याय आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. तोवर विमलबाईंचा मृत्यू झाला होता. काळेंनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. विमलबाईंचा मृत्यू नेमका कसा झाला, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर