दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:10 IST2021-09-18T04:10:06+5:302021-09-18T04:10:06+5:30

माैदा : चालकाचा भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने ताे राेडवर पडला. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही ...

Accidental death of a cyclist | दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

माैदा : चालकाचा भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने ताे राेडवर पडला. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबाडी केसाेरी फाट्याजवळ २८ ऑगस्टला घडली.

ईश्वर महादेव गायधनी (३५, रा. वरंभा, ता. कामठी) असे मृताचे नाव आहे. ईश्वर हा आपल्या एमएच-४०/सीएफ-००४७ क्रमांकाच्या दुचाकीने हल्दीराम कंपनी येथून वरंभा येथे घरी जात हाेता. दरम्यान आंबाडी केसाेरी फाट्याजवळ भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने ताे दुचाकीसह राेडवर पडला. यात त्याच्या डाेक्याला गंभीररीत्या दुखापत झाली. जखमी अवस्थेतच त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनेकर करीत आहेत.

Web Title: Accidental death of a cyclist