दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:09 IST2021-04-23T04:09:45+5:302021-04-23T04:09:45+5:30

भिवापूर : भरधाव दुचाकीसमाेर अचानक रानडुक्कर येऊन धडकले. त्यात राेडवर पडून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

Accidental death of a cyclist | दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

भिवापूर : भरधाव दुचाकीसमाेर अचानक रानडुक्कर येऊन धडकले. त्यात राेडवर पडून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेखेबर्डी शिवारात नुकतीच घडली.

तुकाराम लक्ष्मण राऊत (४०, रा. माेखेबर्डी) असे मृताचे नाव आहे. तुकाराम हा आपल्या एमएच-४०/एमजे-३५११ क्रमांकाच्या दुचाकीने शेतातून घरी माेखेबर्डी येथे येत हाेता. दरम्यान, शिवारातील रस्त्यावर अचानक समाेरून रानडुक्कर येऊन त्याच्या दुचाकीला धडकले. यात रस्त्यावर पडून ताे गंभीररीत्या जखमी झाला. लगेच त्याला भिवापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नागपूर मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक चंगाेले करीत आहेत.

Web Title: Accidental death of a cyclist