दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:12 IST2021-02-17T04:12:14+5:302021-02-17T04:12:14+5:30
खापा : भरधाव दुचाकी स्लीप हाेऊन गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ...

दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
खापा : भरधाव दुचाकी स्लीप हाेऊन गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तिघई शिवारातील खापा ते पाटणसावंगी मार्गावर रविवारी (दि. १४) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
सचिन मुरलीधर खाेब्रागडे (३५, रा. चिचाेली, खापरखेडा, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. सचिन हा एमएच-३१/बीई-५३५६ क्रमांकाच्या दुचाकीने खापा येथून चिचाेली खापरखेडा येथे जात हाेता. दरम्यान, तिघई शिवारात त्याची दुचाकी स्लीप हाेऊन ताे राेडवर पडला. यात सचिनच्या डाेक्याला गंभीररीत्या दुखापत झाली. त्यास नागपूर मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान साेमवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खापा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास सहायक फाैजदार विजय बारई करीत आहेत.