सोनेगावात अपघात एक ठार, एक गंभीर

By Admin | Updated: July 21, 2015 03:18 IST2015-07-21T03:18:04+5:302015-07-21T03:18:04+5:30

भरधाव ट्रकने मागून धडक मारल्यामुळे अ‍ॅक्टिव्हावरील एका बहिणीचा मृत्यू झाला. सोमलवाडा चौकाजवळ सोमवारी दुपारी

Accident of one person killed in Sonega, one serious | सोनेगावात अपघात एक ठार, एक गंभीर

सोनेगावात अपघात एक ठार, एक गंभीर

नागपूर : भरधाव ट्रकने मागून धडक मारल्यामुळे अ‍ॅक्टिव्हावरील एका बहिणीचा मृत्यू झाला. सोमलवाडा चौकाजवळ सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. यामुळे काही वेळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. गोपालनगरातील अंजली घनश्याम भुरे (वय ४५) आणि त्यांची बहीण विजया शाहू अ‍ॅक्टिव्हाने (एमएच ३१/ एसडब्ल्यू ४८९२) वर्धा रोडने जात होत्या. सोमलवाडा चौकाजवळ मागून आलेल्या भरधाव ट्रकने (एमएच ३१/ डीएस १९९५) अ‍ॅक्टिव्हाला जोरदार धडक मारली. त्यामुळे अंजली आणि विजया दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अंजलीला मृत घोषित केले. दरम्यान, या अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली. संतप्त जमावाने आपापली वाहने रस्त्यावर उभी केल्यामुळे या मार्गावरची वाहतूक रखडली. या परिसरात नेहमीच अपघात होतात. त्यामुळे येथे वाहतूक पोलीस नेमावा,अशी जमावाची मागणी होती. काहींनी ट्रकची तोडफोड करण्याचाही प्रयत्न केला.
प्रचंड तणाव निर्माण झाला असतानाच सोनेगावच्या पीएसआय निशा बन्सोड आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावल्या. त्यांनी संतप्त जमावाची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. मृत अंजली यांचा गृहउद्योग आहे. एका आॅर्डरच्या निमित्ताने त्या वर्धा मार्गाने जात होत्या, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Accident of one person killed in Sonega, one serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.