रुग्णवाहिकेला अपघात, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:08 IST2021-03-20T04:08:59+5:302021-03-20T04:08:59+5:30
माैदा : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली रुग्णवाहिका राेडलगत उलटली. यात दाेघे गंभीर जखमी झाले असून, त्यातील एकाचा उपचारादरम्यान ...

रुग्णवाहिकेला अपघात, एकाचा मृत्यू
माैदा : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली रुग्णवाहिका राेडलगत उलटली. यात दाेघे गंभीर जखमी झाले असून, त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेच्यावेळी रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हता. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माैदा-माराेडी मार्गावर नुकतीच घडली.
तारुपेंटर शंकरलाल शिंदे (४०, रा. गुडी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) असे मृताचे तर शकील सिद्दिकी असे जखमी रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. तारुपेंटर या रुग्णवाहिकेवर कंडक्टर म्हणून काम करायचा. या दाेघांनीही त्यांच्या एमपी-५०/डीए-०९०७ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत आणलेल्या रुग्णाला नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले आणि बालाघाटच्या दिशेने परत जायला निघाले. दरम्यान, माैदा-माराेडी दरम्यान, चालक शकीलचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटला आणि ती राेडलगत उलटली. त्यात दाेघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे तारुपेंटरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी चालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार कुथे करीत आहेत.